Russia-Ukraine Crisis: रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अमेरिकेत आंदोलन | Sakal |

2022-02-25 1,034

Russia-Ukraine Crisis: रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अमेरिकेत आंदोलन | Sakal |



रशियाने युक्रेनवर ‘मिलिटरी ऑपरेशन’ सुरू केल्यानंतर अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीतील व्हाईट हाऊसबाहेर आंदोलन करण्यात आलं. युक्रेनवरील रशियन आक्रमणाचा निषेध करण्यासाठी हे लोक जमले होते. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना युक्रेनवरील लष्करी आक्रमण थांबवण्याची मागणी केली. आंदोलकांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांना युक्रेनला पाठिंबा देऊन रशियावर आणखी कठोर कारवाईची विनंती केली. यावेळी युद्ध थांबवा आणि शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहनही आंदोलकांकडून करण्यात आलं. हाडं गोठवणाऱ्या थंडीत आणि पावसाळी वातावरणात आंदोलक व्हाईट हाऊसबाहेर जमले होते.


#Russia-UkraineCrisis #USA #Protest #VladimirPutin #Russia #ukraine

Videos similaires